अर्धा लाख नवमतदार करतील मिनी मंत्रालयासाठी मतदान

By Admin | Updated: February 21, 2017 01:51 IST2017-02-21T01:51:35+5:302017-02-21T01:51:47+5:30

चार तृतीयपंथीयही करणार मतदान

Half million new voters will vote for the mini ministry | अर्धा लाख नवमतदार करतील मिनी मंत्रालयासाठी मतदान

अर्धा लाख नवमतदार करतील मिनी मंत्रालयासाठी मतदान

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होत असून, जिल्ह्यात एकूण २४ लाख २६ हजार ७८१ मतदार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकूण ६४.२३ टक्के मतदान झाले होते. त्यात आणखी मतदान वाढण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.
दरम्यान, २४ लाख २६ हजार ७८१ मतदारामध्ये १२ लाख ७३ हजार ८०६ पुरुष मतदार, तर ११ लाख ५२ हजार ९७१ महिला मतदार आहेत. चार तृतीयपंथीय मतदारांचाही त्यात समावेश असून, हे सर्व तृतीयपंथीय मतदार नांदगाव तालुक्यातील असल्याचे कळते.
मागील पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा मतदारांची संख्या वाढली असून, जवळ जवळ ५० हजार नवमतदार या २४ लाख २६ हजार ७८१ मतदारांच्या यादीत समाविष्ट आहेत. हे ५० हजार नव मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. २१ फेब्रुवारीला जिल्ह्णातील २६४६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.  मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली होती. तसेच मतदारांची यादी व नावे मतदान केंद्रांजवळील मतदान साहाय्यता केंद्रांबाहेर फलकावर लावण्यात आली आहेत.  (प्रतिनिधी)

Web Title: Half million new voters will vote for the mini ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.