शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

हळदी-कुंकू समारंभ : वाणाला जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:16 IST

गृहोपयोगी वस्तूंचे वाण लुटून हळदी-कुंकवाचा सोहळा करणाºया महिलांना यंदा जीएसटीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. लॅस्टिक व इतर गृहोपयोगी वस्तूंचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : गृहोपयोगी वस्तूंचे वाण लुटून हळदी-कुंकवाचा सोहळा करणाºया महिलांना यंदा जीएसटीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. लॅस्टिक व इतर गृहोपयोगी वस्तूंचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.  वर्षातून एकदाच मिळणारी संक्रांतीची संधी न सोडता महिला हटके वाण देण्यासाठी बाजारात वस्तूंचा शोध घेत असून, गरजेप्रमाणे १ ते ५ डझन अशा प्रमाणात वस्तूंची खरेदी करत आहेत. यंदा बाजारात पारंपरिक वस्तूंबरोबरच नवनवीन वस्तूही दाखल झाल्या असून अशा हटके, उपयोगी आणि हायटेक वस्तू घेण्यावर महिला भर देत आहेत.  प्लॅस्टिकच्या डब्या, गाळणी, चमचे यांची जागा आता हेडफोन, मोबाइल कव्हर, मोबाइल स्टॅन्ड, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह, पॉवरबॅँक, चित्रपट, गाण्यांच्या सीडीज, डिव्हिडीज आदी हायटेक अ‍ॅक्सेसरीजने घेतली असून आधुनिक जगतातील आधुनिक नारी आता संक्रांतीचे वाण लुटताना हायटेक झाल्याचे दिसून येत आहे. वाणातले हायटेक आयटम घाऊक प्रमाणात खरेदी करण्यासाठी होलसेल मार्केटची मदत घेतली जात असून, काही महिलांनी तर आॅनलाइन आॅर्डर देऊन वस्तू मागविण्यावरही भर दिलेला दिसून येत आहे.  यंदा महिलांचा वैविध्यपूर्ण वस्तूंची भेट देण्यावर भर दिसून येत आहे. चमचा, पळ्या, उचटणे, काचेचे, स्टील व प्लॅस्टिकचे बाऊल सेट, वाट्या, डिश, स्टीलच्या किसण्या, रोटी प्लेट, भाज्या, फुलांसाठीच्या प्लॅस्टिकच्या परड्या, देवघरात उपयोगी अशा नक्षीदार प्लॅस्टिकच्या प्लेट, चहाच्या  गाळण्या, पावशेर, आतपावच्या मापात साखर, चहा पावडर, केशतेलाच्या बाटल्या, लिपगार्ड, व्हॅसलीन, मॉश्चरायझर्स, कोल्डक्रीम बॉटल, शॅम्पू सॅशे, टाल्कम पावडर, टिकल्या, साडीपिना, पोथ्या, हातरुमाल, हॅँडबॅग, मनीपर्स या वस्तूही बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या असून, त्या १२० ते ४०० रुपये डझन या दरात उपलब्ध होत आहेत.  इतरांपेक्षा आपले वाण हटके, उपयुक्त व आकर्षक कसे ठरेल याचा विचार गृहिणींकडून प्राधान्याने केला जात आहे. हायटेक वस्तूंना प्राधान्य अ‍ॅक्सेसरीजबरोबरच मोड्युलर किचनला शोभतील आणि गृहिणींचे काम सोपे करतील, अशा वस्तूंचाही यंदा वाणात समावेश आहे. त्यात फ्रीजसेफ कंटेरर्स, मायक्रोवेव्ह सेफ प्लॅस्टिकचे बाऊल, मायक्रोवेव्ह सेफ मग, पेटजार्स, स्लायसर, रोटी प्लेट, फ्रुट कटर, लसूण सोलणी आदींचा समावेश असून, बºयाच महिला मैत्रिणींची गरज ओळखून व वाण रिपीट होणार नाही याची काळजी घेत नवनवीन प्रकारांचा शोध आहे. महिला ग्रुपमध्ये हेडफोन, मेमरीकार्ड, मोबाइल स्टॅन्ड अशा वस्तू देण्याचेच यंदा नियोजन करीत आहे. त्यामुळे यंदाचे संक्रांतीचे हळदी-कुंकू हे हायटेक असणार आहे.

टॅग्स :MarketबाजारGSTजीएसटी