ओझर टर्मिनलचे नाममात्र भाडे देऊन एचएएलने ते ताब्यात
By Admin | Updated: November 12, 2014 01:25 IST2014-11-12T01:25:16+5:302014-11-12T01:25:40+5:30
ओझर टर्मिनलचे नाममात्र भाडे देऊन एचएएलने ते ताब्यात

ओझर टर्मिनलचे नाममात्र भाडे देऊन एचएएलने ते ताब्यात
नाशिक : ओझर टर्मिनलचे नाममात्र भाडे देऊन एचएएलने ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व उड्डाण उपसचिव मीना प्रेमसिंह यांची भेट घेऊन केली आहे. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये खर्च करून ओझर टर्मिनलचे बांधकाम केले असून, त्याचे उद्घाटनही करण्यात आले आहे. राज्य सरकार व एचएएलमध्ये यासंदर्भातील करार करण्यात येऊन एचएएलने राज्य सरकारला नाममात्र भाडे देऊन टर्मिनल ताब्यात घ्यावे अशी राज्य सरकारने मागणी केल्याने यासंदर्भातील वाद कायम आहे. या संदर्भातील तिढा लवकर सुटून एचएएलने टर्मिनल ताब्यात घ्यावे, अशी मागणी खासदार गोडसे यांनी करून तसे निवेदन दिले आहे.