एचएएलचे पुणे ते पुणतांबा...

By Admin | Updated: December 6, 2015 23:59 IST2015-12-06T23:58:15+5:302015-12-06T23:59:13+5:30

पॅसेंजर टर्मिनल : ठेकाच द्यायचा होता तर ताब्यात घेण्याचा अट्टहास कशाला

HAL Pune to Puntaamba ... | एचएएलचे पुणे ते पुणतांबा...

एचएएलचे पुणे ते पुणतांबा...

?नाशिक : एखादे नागरी हवाई विमानतळ चालविणे अथवा लष्करी विमानतळ चालविणे यातच मूलभूत मोठा फरक तरीही नागरी हवाई वाहतुकीसाठीचे पॅसेंजर टर्मिनल ताब्यात घेण्याचा जो अट्टहास एचएएलने केला, तोच नेमका शंकास्पद ठरला आहे. नागरी सेवेसाठीच्या टर्मिनलचा ताबा घेतल्यानंतर तो चालविता येत नसल्याने आधी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाला साकडे आणि आता हे टर्मिनल चालवण्यासाठी निविदा काढून एचएएलने जो पुणे ते पुणतांबा प्रवास केला, त्याऐवजी हेच काम राज्य शासन करू शकले असते, मग एचएएलने एवढे करून काय साध्य केले, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये नागरी हवाईसेवा सुरू करण्यासाठी पंचतारांकित वर्गाकडून आजवर ज्या ज्या मागण्या करण्यात आल्या, त्या टप्प्याटप्प्याने राज्य शासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींनी पूर्ण केल्या आहेत.

Web Title: HAL Pune to Puntaamba ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.