शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल करणार निर्मिती : ‘कॅट्स’ला मिळणार रशियन कामोव्ह-२२६टी लढाऊ हेलिकॉप्टर

By अझहर शेख | Updated: November 24, 2018 13:24 IST

रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे.

ठळक मुद्देलढाऊ हेलिकॉप्टरचे लवकरच आगमन ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार

नाशिक : येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ताफ्यात आगामी काही महिन्यांमध्ये अत्याधुनिक रशियन बनावटीचे कामोव्ह-२२६टी हलक्या वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.भारताने रशियाच्या संरक्षण खात्यासोबत केलेल्या संयुक्त करारांतर्गत रशियाच्या मदतीने कामोव्ह-२२६टी या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती केली जाणार आहे. भारतीय सैन्य दलासाठी ही आनंदाची बातमी असून, कामोव्ह हे बहुद्देशीय हलके लढाऊ हेलिकॉप्टर सैन्याकडे सध्या असलेल्या चित्ता, चेतक या लढाऊ हेलिकॉप्टरची जागा घेणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठीदेखील भविष्यात ‘कामोव्ह-२२६टी’ हे हेलिकॉप्टर उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. कारण कामोव्ह निर्मितीचा मार्ग मागील वर्षी मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबतच्या संयुक्त उपक्रमांतर्गत करार स्वाक्षरी केला आहे. रशियन बनावटीचे ६० कामोव्ह हेलिकॉप्टर भारताच्या सैन्य दलात येणार असून, उर्वरित १४० हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) रशियन संरक्षण फ र्मसोबत यासाठी संयुक्त करार केला आहे. 

लढाऊ हेलिकॉप्टरचे लवकरच आगमनआगामी दोन वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण खात्यात आमूलाग्र बदल होताना दिसून येतील. नुकतेच सैन्य दलात देवळालीच्या तोफखाना केंद्राद्वारे हॉवित्झर आणि वज्र या तोफांचे आगमन झाले. तसेच लवकरच गांधीनगरच्या कॅट्सच्या मैदानावरून सैन्य दलात नव्या अत्याधुनिक अशा लढाऊ हेलिकॉप्टरचे आगमन होईल, असा विश्वास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. भारत-रशियाच्या संयुक्त करारांतर्गत होणाऱ्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीचा मोठा प्रकल्प एचएएलच्या मदतीने पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे एचएएलकडे काम नाही किंवा एचएएल बंद पडणार या निव्वळ अफवाच असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्ता, चेतक अन् ध्रुव ‘कॅट्स’चा कणा‘कॅट्स’मध्ये लढाऊ हेलिकॉप्टरचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी वर्षभराचे खडतर व शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेत देशसेवेसाठी सज्ज केली जाते. कॅट्स हे अत्याधुनिक असे भारतीय सैन्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. गांधीनगर येथे स्वतंत्ररीत्या या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. येथे युद्धजन्य व आपत्कालीन परिस्थितीत हेलिकॉप्टर चालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndiaभारतIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल