एच.ए.एल. हायस्कूल, ओझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:17 IST2021-09-07T04:17:46+5:302021-09-07T04:17:46+5:30
ओझरटाऊनशिप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल (मराठी माध्यम) मध्ये सकाळी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा ...

एच.ए.एल. हायस्कूल, ओझर
ओझरटाऊनशिप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. हायस्कूल (मराठी माध्यम) मध्ये सकाळी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. के. पवार होते.
प्रारंभी मुख्याध्यापक पवार यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात आर.आर. कुलकर्णी यांनी डाॅ. राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी काजल भालेराव, जस्मिन शेख या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक पवार यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ शिक्षक जे.एन. आहिरे यांनी आभार मानले. तांत्रिक साहाय्य एस.टी. गुंजाळ यांनी केले.
फोटो - ०६ ओझर १
ओझर येथील एच.ए.एल. हायस्कूलमध्ये शिक्षक दिन कार्यक्रमप्रसंगी प्रतिमा पूजन करताना मुख्याध्यापक डी. के. पवार. समवेत शिक्षकवृंद व विद्यार्थी.
060921\06nsk_12_06092021_13.jpg
ओझर येथील एच ए एल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन कार्यक्रमप्रसंगी प्रतिमा पुजन करताना मुख्याध्यापक डी. के. पवार. समवेत शिक्षकवृंद व विद्यार्थी.