शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

संरक्षणमंत्र्यांच्या निषेधार्थ एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा  मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:36 AM

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. सीतारामन यांनी एचएएलबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.

नाशिक : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या क्षमतेविषयी संशय घेणारे वक्तव्य करून संरक्षणमंत्रीनिर्मला सीतारामन् यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी एचएएलच्या कर्मचा-यांनी ओझरहून नाशकात येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. सीतारामन यांनी एचएएलबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले.  एचएएल कर्मचा-यांची पहिली शिफ्ट संपल्यानंतर सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचा-यांनी ओझर येथून दुपारी मिळेल त्यावाहनाने नाशिक गाठले. कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचा-यांनी संरक्षणमंत्रीनिर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोेषणाबाजी करून निदर्शने केली व त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, तत्कालीन संरक्षणमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने ओझर येथे लढाऊ विमान बनविणाºया कंपनीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ५३ वर्षांत मिग-२१, मिग २१ (एम), मिग-२७ व सुखोई-३० इत्यादी विमानांचे उत्पादन करण्यात आले. सुखोई-३०च्या ओव्हरहॉलचे काम जे आजपर्यंत कुणीही केले नाही ते एचएएलने करून दाखविले. सुखोई-३० चे उत्पादन अंतिम टप्प्यात असून, २०१९-२० नंतर एचएएलकडे वर्कलोड नाही. ते मिळविण्यासाठी संरक्षणमंत्री, राज्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती समजावून सांगूनही आमच्या पदरात काहीच पडले नाही. उलट फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने घेण्याचा करार करण्यात येत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी एचएएलचे आजी-माजी पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.एचएएलला बदनाम करून राफेलचे काम रिलायन्स डिफेन्स या कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला देण्यात येत आहे. मागील आठवड्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी, एचएएलकडे राफेलचे काम करण्याची क्षमता नाही. एचएएल वेळेत काम पूर्ण करू शकत नाही, असे वक्तव्य करून एचएएलला बदनाम केले तसेच कार्यक्षमतेवर संशय घेतला असून, त्याचा जाहीर निषेध करीत आहोत. संरक्षणमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.

टॅग्स :ministerमंत्रीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन