एचएएल कंत्राटी भरती परीक्षा
By Admin | Updated: December 21, 2015 00:25 IST2015-12-21T00:23:15+5:302015-12-21T00:25:03+5:30
४० निदर्शकांना घेतले ताब्यात

एचएएल कंत्राटी भरती परीक्षा
नाशिक : एचएएलमधील हंगामी कर्मचारी भरतीविरोधात कामगार संघटनेतर्फे परीक्षा केंद्र असलेल्या क़ का़ वाघ महाविद्यालयासमोर रविवारी निदर्शने करण्यात आली़ या सुमारे ४० निदर्शकांना आडगाव पोेलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईनंतर सोडून दिले़ एचएएलमध्ये चार वर्षांसाठी होणारी हंगामी कर्मचाऱ्यांची भरती कामगार व कामगार संघटना यांच्यासाठी घातक असल्याचा संघटनेचा आरोप आहे़ या भरतीमुळे कामगारांच्या भविष्यावर कायमची टांगती तलवार ठेवून त्यांची आयुष्यभर पिळवणूक होणार असल्यामुळे एचएएल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रा बाहेर निदर्शने केली़ दरम्यान, १९ हजार अर्जांपैकी केवळ ५५ टक्के उमेदवारांनी परीक्षा दिल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)