हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीत धावांची बरसात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST2021-02-06T04:26:24+5:302021-02-06T04:26:24+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील गटातील साखळी सामन्यात डावखुरा सलामीवीर ...

Hakim Merchant Cricket Trophy runs in the rain! | हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीत धावांची बरसात !

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीत धावांची बरसात !

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या १६ वर्षांखालील गटातील साखळी सामन्यात डावखुरा सलामीवीर शर्विन किसवेने घणाघाती द्विशतक झळकावले. केवळ १२९ चेंडूत २९ चौकार व १० षटकारांसह २४६ धावा फटकाविल्या. तर साहिल पारखनेही १६७ धावा करीत त्यास उत्तम साथ दिल्यामुळे ह्या डावखुऱ्या जोडीने केवळ ३६.१ षटकांत ४३७ धावांची जबरदस्त सलामीची भागीदारी केली. साहिल पारखने १६७ धावा करीत त्यास उत्तम साथ दिली.

नाशिक क्रिकेट अकादमीतर्फे भूमी क्रिकेट क्लब विरूद्ध खेळताना त्या दोघांनी ही कामगिरी केली. त्यांच्या या घणाघाती कामगिरीमुळे नाशिक क्रिकेट अकादमी संघाने ४५ षटकांत ५ बाद ५१३ अशी उत्तुंग धावसंख्या उभारून ४३१ धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्याधीच्या सामान्यातही शर्विनने आर. व्ही. स्पोर्ट्स अकादमी विरूद्ध नाबाद शतक झळकावून संघाच्या विजयात मोठी कामगिरी बजावली. तर साहिल पारखने ही आई तुळजाभवानी अ संघाविरुद्ध दीडशतक झळकावून विजयी धावसंख्येचा पाया रचला. एनएसएफए संघाने वेदान्त सोनवणेच्या नाबाद १४१ धावांच्या जोरावर नाशिक जिमखानावर १४१ धावांनी मात केली. तर मानस साळुंकेच्या शतकाच्या जोरावर आई तुळजाभवानी ब संघाविरुद्धही एनएसएफए संघाने विजय मिळवला. नाशिक क्रिकेट अकादमी संघाने अ गटातील तीनही सामने जिंकत गटात पहिला क्रमांक मिळविला. ब गटात एनडी सीए - मॉर्निंग तर क गटात २२ यार्ड हे संघ प्रत्येकी २ सामने जिंकून आघाडीवर आहेत.

फोटो

०५शर्विन किसवे

०५साहिल पारख

Web Title: Hakim Merchant Cricket Trophy runs in the rain!