तिसरा महाजचे हाजी इब्राहीम प्रभाग २३ ब मधून विजयी

By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-06-30T23:18:14+5:302014-07-01T01:29:33+5:30

आझादनगर : मालेगाव महानगर-पालिकेच्या प्रभाग क्र. २३ ब च्या पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मो. इब्राहीम मो. यासीन (नॅशनलवाला) यांनी काँग्रेसचे अ. सईद शेख हमीद (टाटा)चा ५३१ मतांनी पराभव केला.

Haji Abraham III of 3rd Mahaj won from Division 23 B | तिसरा महाजचे हाजी इब्राहीम प्रभाग २३ ब मधून विजयी

तिसरा महाजचे हाजी इब्राहीम प्रभाग २३ ब मधून विजयी

आझादनगर : मालेगाव महानगर-पालिकेच्या प्रभाग क्र. २३ ब च्या पोटनिवडणुकीत तिसरा महाजचे हाजी मो. इब्राहीम मो. यासीन (नॅशनलवाला) यांनी काँग्रेसचे अ. सईद शेख हमीद (टाटा)चा ५३१ मतांनी पराभव केला. यापूर्वी मो. इब्राहीम यांनी सतत तीन वेळ्या मनपा निवडणुकीत पराभवाचा सामना करीत प्रथमच यांच्या गळ्यात विजयी माळा पडली आहे.
आज सकाळी सुमारे ९ वाजता मनपाच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत एका टेबलवर पेटी क्र. १, ३, ५, तर दुसऱ्या टेबलवर पेटी क्र. २, ४, ६ अशी व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या फेरीसाठी पहिल्या टेबलवर ७, ९, ११ तर दुसऱ्या टेबलवर ८, १०, १२ अशी मतमोजणी करण्यात आली. मो. इब्राहीम यांनी पहिल्या फेरीमध्येच आघाडी घेतली होती.
मो. इब्राहीम मो. यासीन (तिसरा महाज) २६८७, अ. सईद शेख
हमीद (काँग्रेस) २२५६, शेख गौस शेख मुनीर (जनता दल) ७८३, शेख फरीद शेख समज (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ५८४ आणि अलताफ हुसैन निसार अहमद १२२ अशी मते मिळाली. यामध्ये ३४ मतदारांनी नोटाचा वापर केला. यापूर्वी ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती ती तिसरा महाजने काबीज केली. (वार्ताहर)

Web Title: Haji Abraham III of 3rd Mahaj won from Division 23 B

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.