जायखेड्यात मोसम नदीचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:21 IST2018-08-21T15:21:32+5:302018-08-21T15:21:43+5:30
जायखेडा : येथील ग्रामपंचायती मार्फत मोसम नदीच्या जलपूजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते मोसम नदीचे जलपूजन करण्यात आले.

जायखेड्यात मोसम नदीचे जलपूजन
जायखेडा : येथील ग्रामपंचायती मार्फत मोसम नदीच्या जलपूजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते मोसम नदीचे जलपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुक्र ाम सोनवणे, सदस्य विजय बच्छाव, छाया जगताप, बेबीबाई शेवाळे, वसंत खैरनार, सचिन जगताप, सुरेश अहिरे, दावल सोनवणे, हिरामण जगताप, संदेश मोरे, अहल्याबाई अहिरे, हर्षाली जगताप, मनीषा जगताप, हर्षाली खैरनार, कलाबाई अहिरे, रत्ना शेवाळे, चंद्राबाई वाघ. यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले असतांही संपूर्ण मोसम खोº्यात पावसाची प्रतीक्षा केली जात होती. या दरम्यान हरणबारी धरणाच्या लाभ क्षेत्रात चांगल पाऊस झाल्याने. हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. व मोसम नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे नदी काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. या निमित्ताने काठावरील गावांमध्ये ठिकठिकाणी जलपूजन करण्यात येत आहे. (21जायखेडाजलपूजन)