शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

हज-उमराह टुर्स व्यावसायिकाला पावणेदोन कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:29 PM

सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे

ठळक मुद्देसंशयित व्यावसायिकांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल पुर्वनियोजित कट-कारस्थान

नाशिक : हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांच्या तिकिटाची रक्कम जुन्या नाशकातील टूर व्यावसायिकाने दिपालीनगर येथील फिर्यादी व्यावसायिकाला परत केली नाही. तसेच दिलेले धनादेश बॅँकेतून वठलेही नाही, त्यामुळे आपली पावणेदोनकोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी अशपाक रमजान पठाण (३२) यांनी संशयित व्यावसायिकांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, १ आॅगस्ट २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत दिपालीनगर येथील अल-खैर टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक पठाण यांच्याकडे संशयित आरोपी अब्दुल मतीन मनियार (रा. पॅराडाईज हाईट्स, वडाळारोड), अजीज बनेमिया मनियार, जावेद हनीफ शेख (रा. सेक्टर-२ वाशी, नवी मुंबई), समीर मनियार (काजीपुरा, जुने नाशिक) यांनी त्यांना काही प्रवाशी विमानतळावर अडकले असल्याने ‘आम्ही अडचणीत आलो आहोत, तुम्ही त्यांचे तिकिट काढून द्यावे, आम्ही तुम्हाला तिकिटाच्या रकमेचे धनादेश देऊ’ असे सांगून विश्वास संपादन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ठरलेल्या व्यवहारानुसार १ कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपये दिले नाही त्यामुळे पठाण यांनी या चौघांविरुध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व संशयितांमध्ये यापुर्वीही असे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तिकिटासाठी फिर्यादीने भरलेली रक्कम व नफा असा दुहेरी आर्थिक फ टका त्यांना बसला आहे. चौघांनी आपआपसांत संगनमत करुन पुर्वनियोजित कट-कारस्थान रचून विश्वासघात केल्याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हज, उमराह यात्रेसाठी जाणा-या भाविकांना खासगी टुर्समार्फत प्रवास सुविधा पुरविण्याचा पठाण यांचा व्यवसाय दिपालीनगरमध्ये आहे. त्यांनी वर्षभरापुर्वीच हा व्यवसाय सुरू केल्याचे समजते. संशयित चौघेदेखील हज-उमराह यात्रा टुर्सचा व्यवसाय करतात, त्यांनी पठाण यांच्यामार्फत सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे. संशयितांनी त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला; मात्र बॅँक खात्यात धनादेशावरील रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वठू शकला नाही, तेव्हा फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांविरुध्द फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक नंदवाळकर करीत आहेत.

टॅग्स :Haj yatraहज यात्राNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी