येवला तालुक्यात गारपिटीने कांदा, डाळिंबाचे नुकसान
By Admin | Updated: May 13, 2014 00:41 IST2014-05-12T21:54:34+5:302014-05-13T00:41:34+5:30
येवला : वादळी वार्यासह गारपिटीने तालुक्याच्या पश्चिम भागातील नेऊरगाव, पुरणगाव, जळगावनेऊर, एरंडगाव, महालखेडा, एरंडगाव परिसराला झोडपल्याने कांद्यासह डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

येवला तालुक्यात गारपिटीने कांदा, डाळिंबाचे नुकसान
येवला : वादळी वार्यासह गारपिटीने तालुक्याच्या पश्चिम भागातील नेऊरगाव, पुरणगाव, जळगावनेऊर, एरंडगाव, महालखेडा, एरंडगाव परिसराला झोडपल्याने कांद्यासह डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
बुधवारी रात्री ८ च्या सुमारास वादळवार्यासह पावसाला सुरुवात झाली. गारपिटीच्या तडाख्याने नेऊरगाव येथील सुरेश कदम यांचे ४०० क्िंवटल कांदे गारपिटीने झोडपले व पूर्णत: खराब झाले. रामनाथ कदम, विजय कदम, राजेंद्र बोराडे, वसंत कदम आदिंसह अनेक शेतकर्यांच्या डाळींबबागा पूर्णत: उखडल्या गेल्या. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मार्च महिन्यातील मोठ्या प्रमाणावर पावसाने पश्चिम भागात कांदा भिजला होता. तब्बल दीड महिन्यानंतर हा कांदा आतून पूर्णत: सडला आहे. हे नुकसान सोसत नाही तोच बुधवारच्या गारपिटीने उरले सुरले कांदे व डाळिंब बागा उखडल्या. मार्च महिन्यात पावसाने जमिनीतच भिजलेल्या कांद्याचे कायदेशीर गारपिटीच्या भाषेमुळे पंचनामे झाले नव्हते; परंतु केवळ पाण्याने भिजलेला हा कांदा जमिनीतच सडला होता. केवळ गारपिटीने भिजलेल्या कांद्याचे पंचनामे केले गेले. पण पावसाने सडलेल्या कांद्याचे काय? असा सवाल येथील शेतकर्यांनी विचारला आहे. आतातरी नुकसानीचे पंचनामे व्हावेत व आम्हाला न्याय द्यावा, अशी हाक येथील शेतकर्यांनी दिली आहे. तत्काळ सर्वे व्हावा व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
नेऊरगाव येथील दूध संकलन केंद्राच्या कार्यालयावर वादळवार्यामुळे एक झाड कोसळले व या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांनी शेतात पोळ करून ठेवलेला कांदा गारपिटीच्या तडाख्यात सापडला. अचानकपणे गारपिटीने शेतकरी भांबावला व अनपेक्षित तडाखा बसल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.