सुळे कालव्याचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 16:11 IST2018-09-17T16:10:01+5:302018-09-17T16:11:00+5:30

खामखेडा: सुळे डाव्या लाभ क्षेत्रातील खामखेडा येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

 Hailstorm of the canal of canal | सुळे कालव्याचे जलपूजन

सुळे कालव्याचे जलपूजन

ठळक मुद्देसुळे डाव्या कालव्याचे काम टप्याटप्याने करण्यात येत होते.गेल्या दहा वर्षांपूर्वी या सुळे डाव्या कालव्याचे पिळकोस गावापर्यत झाल्याने पाण्याची चाचणीही करण्यात आली होती.मात्र येथून पुढे कालव्याचे काम राखले होते.


खामखेडा: सुळे डाव्या लाभ क्षेत्रातील खामखेडा येथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
सुळे डाव्या कालव्याचे काम टप्याटप्याने करण्यात येत होते.गेल्या दहा वर्षांपूर्वी या सुळे डाव्या कालव्याचे पिळकोस गावापर्यत झाल्याने पाण्याची चाचणीही करण्यात आली होती.मात्र येथून पुढे कालव्याचे काम राखले होते.तेव्हा या पुढच्या कामाला गती मिळावी म्हणून स्वर्गीय माजी आरोग्य मंत्री डॉ दौलतराव आहेर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पुढील कामाची निविदा काढून कामाला सुरु वात केली. परंतु मध्य काही शेतकऱ्यांनी कालव्याच्या कामाला हरकत घेतल्याने चार-पाच वर्षे कालव्याचे काम बंद होते. तेव्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष केदा आहेर यांनी मध्यस्थी करून त्या शेतकºयांशी संवाद साधून त्यांची समजूत काढून बंद काम सूर केले .परंतु या कालव्यास पुढे पाणी मिळत नव्हते.तेव्हा खामखेडा ,सावकी येथील शेतकºयांनी या कालव्यास पाणी मिळण्याची म्हणून मागणी होती. या कालव्यास पाणी सोडण्यात आले.त्यामुळे या कालव्याच्या पाण्यामुळे खामखेडा, सावकी परिसरातील जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.,
आमदार डॉ राहुल आहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर याचा हस्ते जलपूजन करण्यात आले.यावेळी त्याच्या सोबत  धनश्री अहेर, कल्पना देशमुख, पंकज निकम, शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title:  Hailstorm of the canal of canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.