नाशिकरोडला गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:12 IST2021-04-29T04:12:01+5:302021-04-29T04:12:01+5:30

नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव परिसरात सर्वत्र बुधवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी चारपासूनच काळे ...

Hail on Nashik Road | नाशिकरोडला गारांचा पाऊस

नाशिकरोडला गारांचा पाऊस

नाशिकरोड, जेलरोड, देवळालीगाव परिसरात सर्वत्र बुधवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी चारपासूनच काळे ढग दाटून आले होते. पावसाचे वातावरण होते. सायंकाळी सहानंतर वारे वाहण्यास सुरुवात झाली. सातच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. काही भागांत पावसाचा जोर जास्त तर काही भागांत कमी होता. मात्र, गारा बहुतेक सर्व ठिकाणी पडल्याने धावपळ झाली. औषध दुकानेवगळता सकाळी अकरा वाजल्यानंतर भाजी विक्रेते, व्यावसायिक आदी सर्वांना व्यवसायाला प्रतिबंध आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी सकाळीच व्यवसाय बंद केल्याने पावसाने त्यांची धावपळ उडाली नाही. रस्त्यावर वाहतूक पावसामुळे मंदावली होती. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट असतानाच पाऊस आल्याने धास्तीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Hail on Nashik Road