सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:18 IST2018-12-16T18:12:58+5:302018-12-16T18:18:13+5:30
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विहीरीतुन हरिण बाहेर काढण्यात आले त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी वनसेवक व्ही एस लोंढे, मच्छिंद्र ठाकरे व समाधान आगवन आदी.
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
राजापूर-ममदापूर हे वनविभागाचे राखीव वनसंवर्धन आहे. याठिकाणी हरणासाठी कूठल्याही उपाय योजना केलेल्या दिसत नाही. वन विभागाने पाच एकर क्षेत्रावर तार कंपाउंड केलेले आहे. याठिकाणी जखमी हरणांना तेथे सोडण्यात येते वन विभागाने राखीव वनसंवर्धनासाठी खर्च केलेले आहे. मात्र हरणाचा मृत्यू कधी थांबणार अशा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. राजापूर व परिसरात हजारोच्या संख्येने हरिण, काळविट पाहवयास मिळतात, मात्र या हरणाचा मृत्यू हा विहिरीत पडूनच झाला. कारण येथील विहिरींना कठडे नाहीत.
सोमठाण जोश येथे विहिरीत नर जातीचा काळविटाचा मृत्यू झाला. सोमठाण जोश येथील उत्तम राठोड यांच्या विहिरीत हरिणाचा मृत्यू झशल्याचे आढळल्याने सोमठाण येथील शेतकरी परशराम राठोड व समाधान आगवन हे दुपारी शेळ्या चारण्यासाठी मळयात गेले असता त्यांना विहिरीत हरिण मरण पावलेले दिसले. त्यांनी राजापूर वन विभाग यांना फोन करून माहिती दिली असता वनरक्षक गोपाळ हारगावकर यांच्या मार्गदर्शनाने वनसेवक व्ही. एस. लोंढे व मच्छिंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन हरिण विहिरीतून बाहेर काढले. त्या हरणाचे शवविच्छेदन करून त्याला दफन करण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाने या भागातील विहिरींना कठडे बांधून द्यावेत. अशी मागणी परिसरातून होत आहे.