संस्कार भारती, शंकराचार्य न्यासतर्फे हायफा डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:25+5:302021-09-24T04:16:25+5:30
नाशिक : संस्कार भारती व शंकराचार्य न्यासतर्फे बालाजी मंदिरात आकर्षक रांगोळी साकारत हायफा डे (२३ सप्टेंबर) साजरा करण्यात आला. ...

संस्कार भारती, शंकराचार्य न्यासतर्फे हायफा डे साजरा
नाशिक : संस्कार भारती व शंकराचार्य न्यासतर्फे बालाजी मंदिरात आकर्षक रांगोळी साकारत हायफा डे (२३ सप्टेंबर) साजरा करण्यात आला. यावेळी तीन रेजिमेंटचे प्रतीक म्हणून आ. सीमा हिरे यांच्या हस्ते तीन वेळा दिपप्रज्वलन करण्यात आले.
पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यात २३ सप्टेंबर १९१८ रोजी ब्रिटिश आर्मीअंतर्गत असलेल्या तीन भारतीय रेजिमेंटने तुर्की, जर्मन व ॲास्ट्रियन फौजांचा पराभव करत पॅलेस्टाइनमधील हायफा बंदर मुक्त केले. तेव्हापासून भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण म्हणून २३ सप्टेंबर हा दिवस हायफा डे म्हणून साजरा केला जातो. तसेच सैन्यदलाच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी दिल्लीतील एका चौकात तीन मूर्ती बसवून चौकाचे नाव तीन मूर्ती चौक ठेवण्यात आले आहे. या दिवसाचे प्रतीक म्हणून देशभर विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाशिक शहरात संस्कार भारती व शंकराचार्य न्यासतर्फे बालाजी मंदिरात हायफा डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमास आ. सीमा हिरे, महेश हिरे, सैनिक आघाडीचे अध्यक्ष विश्वास पारनेरकर, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, संस्कार भारतीचे रवींद्र बेडेकर उपस्थित होते.
----- फोटो : आर ला २३ हायफा डे -------