धामणगाव येथे ह्यडोनेट अ डिव्हाईसह्ण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:41 PM2020-11-05T18:41:40+5:302020-11-05T18:42:41+5:30

नांदूरवैद्य : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ संकल्पना मांडत इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Hadonet A Device Program at Dhamangaon | धामणगाव येथे ह्यडोनेट अ डिव्हाईसह्ण कार्यक्रम

धामणगाव येथे डोनेट अ डिव्हाइस कार्यक्रमाप्रसंगी मुलांना रेडिओचे वाटप करताना सोमनाथ जोशी. समवेत उत्तम भोसले, मधुकर दराडे व इतर.

Next
ठळक मुद्देनाशिक आकाशवाणी केंद्राच्या २७व्या वर्धापन दिनाचे औचित्य

नांदूरवैद्य : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ संकल्पना मांडत इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे नुकत्याच राष्ट्रीय एकात्मता व नाशिक आकाशवाणी केंद्राच्या २७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत येथील जिल्हा परिषद शाळेत इगतपुरीच्या उपसभापती विमल गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी व माजी सदस्य बाळासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४२ एफएम रेडिओचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महिला शिक्षकांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख मधुकर दराडे यांनी केले. यामध्ये डोनेट अ डिव्हाइस उपक्रमाची संकल्पना, गरज व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी इशस्तवन आंबेकर यांनी व चंद्रकांत भांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी, तर विनायक पानसरे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच उत्तम भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गाढवे, नामदेव गाढवे, तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

Web Title: Hadonet A Device Program at Dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.