रिक्षातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: December 12, 2015 23:55 IST2015-12-12T23:54:42+5:302015-12-12T23:55:34+5:30
रिक्षातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना अटक

रिक्षातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना अटक
मालेगाव : येथील चाळीसगाव चौफुली येथे महामार्गावर रिक्षातून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली
आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गोविंद गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे की, गुरुवारी रात्री साडेदहा वाजता शेख रईस शेख कलीम (३०) आणि शेख साबीर शेख कलीम (२७) दोघे रा. महाराष्ट्र साईजिंग मागे, आयशानगर हे आॅटोरिक्षाने (क्र. एम.एच.४१ व्ही. ३०९१) ३८हजार ६५२ रुपये किमतीच्या गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक खडांगळे तपास करीत आहेत.
४त्र्यंबकेश्वर : येथील अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आश्रमात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन मुलांशी संवाद साधत त्यांना विविध वस्तूंचे वाटप केले.