शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून नाशकात गुटख्याची तस्करी; ६२ गोण्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:16 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीसांना  चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त गुटख्यासह दोघांना पकड़ण्यात पोलिसांना यश गुजरातमधून नाशकात गुटक्याची तस्करी

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीसांना  चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दोघा संशयितांसह चारचाकी वाहन आणि ६२ गोण्यातील दोन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.  गुन्हेगारीवर वचक बसावा यासाठी पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण नाशिक शहरात दिवस-रात्र नाकाबंदी केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिर चौफुलीवर शुक्रवारी नाकाबंदी सुरू असताना पांढºया रंगाच्या एरटीगा चारचाकी क्रमांक (एमएच ३९जे ३७४३) पोलिसांना चकवा देत रासबिहारी रस्त्याने पळून जाऊ लागल्याने पोलिसांना संशय आल्याने संबंधित वाहन थांबवून पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनातून ६२ गोण्यांमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले. याबाबत आडगाव पोलिसांना माहिती देत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पाथर्डीफाटा येथील जैद शेख व भद्रकाली येथे राहणाऱ्या फैयाज शेख अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक इनामदार, पोलीस शिपाई गणेश माळवाल, संदीप मालसाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनेविषयी अन्न व औषध प्रशासनालाही माहिती देत पंचनामा केला.

शहरात सऱ्हासपणे गुटख्याची तस्करी गुटखा सेवनाने आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन तसेच युवा पिढीत गुटख्याची व्यसनाधीनता टाळण्यासाठी शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे.  तरीही शहरात वेगवेगळ््या मार्गाने सऱ्हापणे गुजरात राज्यातून गुटखा आणल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातील विशेषता भद्रकाली व जुने नाशिक भागात असलेले तंबाखू विक्रीवाले सर्रासपणे गुटखा खरेदी करून नाशिक शहरातील पान टपरी चालक ते किराणा दुकानदारापर्यंत पोहोचत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. 

अन्न औषध प्रशासन अंधारात?नाशिक शहरात दैनंदिन लाखो रुपयांचा गुटखा चोरीछुपे या पद्धतीने आणला जात असला तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुटख्याच्या वाहतुकीबाबत तसेच नाशिक शहरात दुकानांमध्ये गुटका असल्याबाबत अन्न व औषध प्रशासन अंधारात आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अवैधरीत्या होणाºया गुटख्याच्या वाहतूक व विक्रीवर अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अपेक्षित असली तरी त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस