गुरूने दिला ज्ञानरुपी वसा... आम्ही चालवू हा पुढे वारसा
By Admin | Updated: August 2, 2015 23:18 IST2015-08-02T23:18:15+5:302015-08-02T23:18:54+5:30
शहर परिसरात गुरुपौर्णिमा : विविध कार्यक्रम, सत्कार, शोभायात्रा

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा... आम्ही चालवू हा पुढे वारसा
नाशिक : गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध शाळा आणि संस्थांमध्ये विविध उपक्रम पार पडले. नवीन आडगाव नाक्यावरील श्री तपोवन ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री स्वामिनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एकनाथ महाराज व संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘एक पै’ची चूक या विषयावर नाटिका सादर करण्यात आली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पालकांसाठी रांगोळी स्पर्धा, आरती थाळी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व या विषयावर माहिती विशद करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत दुर्गा पाटील यांनी प्रथम, तर रूपाली खेडकर यांनी द्वितीय व भक्ती सौंदाणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. आरती थाळी सजावट स्पर्धेत दमयंती वेलाणी प्रथम, पल्लवी गायकवाड द्वितीय, कविता वेलाणी या तृतिय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. यावेळी शाळेचे विश्वस्त ज्ञानपुराणी स्वामी, मुख्य प्रशासक माधवप्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल, आरती आंबेकर, मनीषा एकबोटे आदि उपस्थित होत्या. अथर्व जोशी व गौरी जोशी यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.
शिवाजी विद्यालय
मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. टी. साळवे होते. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा तसेच गुरूंचे महत्त्व यावर माहिती दिली. कार्यक्रमाला के. पी. पाटील, प्रशांत महाबळ, के. जे. सोनवणे, एच. एस. अहिरे, नेहा पिंगळे आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेत अमृतपूर्ती महोत्सवाअंतर्गत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात सचिन जोशी यांनी ‘२१व्या शतकातील शिक्षक’ या विषयावर व्याख्यान दिले. जोशी यांनी यावेळी पारंपरिक शिक्षणपद्धती दूर ठेवून सर्जनशील शिक्षणाची आज गरज असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे विविध शिक्षक, कर्मचारीवृंद उपस्थित होते.
पेठे विद्यालय
रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन नमन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापक गीता कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षक प्रियंका निकम, कुंदा जोशी आदि उपस्थित होते.
गुरूपूजनाने बौध्दिक
विकास : गुट्टे
गुरूंचा महिमा कितीही वर्णावा तरी पूर्ण होऊ शकत नाही. गुरूपूजनाने बौध्दिक विकास होत असल्याचे विचार डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले. सिध्दिविनायक मानव कल्याण मिशनतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त पंचवटीतील रामगढीया भवन विविध धार्मिक कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मान्यवर व भक्तपरिवारांतर्फे गुरूपूजन करण्यात आले. कार्यक्र मास महापौर अशोक मुतर्डक, नगरसेवक रुची कुंभारकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, अॅड. नंदकिशोर भुतडा, हेमंत धात्रक, सोमेश्वर काबरा, गिरीश पालवे, सुनील केदार, ज्योतीराव खैरनार व भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्याम पिंपरकर यांनी, तर सोमनाथ बोडके यांनी आभार मानले.
शक्ती विकास अकॅडमी
शक्ती विकास अकॅडमी बहुद्देशीय संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त अनंत कान्हेरे मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष मनोहर जगताप, मनीषा जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला अशोक जगताप, सतीश काळे, दीपक जगदाळे, परवीन शेख, शबनम खलिफा, वैभव कुराडे आदि उपस्थित होते.
उंटवाडी माध्यमिक
उंटवाडी माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक एल. एस. जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून गीता पेंडसे उपस्थित होत्या. दुसऱ्या सत्र कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रफिक इमानदार उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी, संध्या जोशी, ज्योती कुलकर्णी, सुनंदा कुलकर्णी, ऐश्वर्या सोनवणे, आदित्य पंडित, नीलम कानडे, यतेंद्र महाजन आदि उपस्थित होते.
शिशुविहार शाळा
शिशुविहार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. माता-पालकांचे स्वागत फूल व पुस्तक देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विजया पाटील उपस्थित होत्या. नेहा सोमण यांनी मार्गदर्शन केले.
के. के. वाघ स्कूल
सरस्वतीनगर येथील के. के. वाघ स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणे केली. अनुराधा ढवण यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सिमरन माखिजानी, सरिता जाधव, वर्षा ह्याळीज उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालय पाथर्डी
माध्यमिक विद्यालय पाथर्डी येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संजय जाचक होते. मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
मटाले माध्यमिक विद्यालय
येथील जगदंब प्रतिष्ठानतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक म्हसदे, प्रतिष्ठानचे संस्थापक सोमनाथ काची, अध्यक्ष कमलेश काची, उपाध्यक्ष यश हिरवटे, रुपाली जोशी, आकाश नेहे, महेश संगपाळ, महेश मोरे, भारत सोनार, महेश निंबेकर, पुरुषोत्तम आव्हाड, दर्शन संगपाळ, समाधान जाधव, रवि कदम आदि उपस्थित होते.
जनता विद्यालय सातपूर
जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्याक एस. डी. शिंदे होते. सविता ठाकरे, मयूरी साबळे, सोनाली वागळे यांनी गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन साक्षी बागडे हिने केले. आभार बी. ई. जाधव यांनी मानले.
बालशिक्षण मंदिर
गोरेराम लेन येथील बलशिक्षण मंदिरात विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मनीषा मते यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या.
ति. झं. विद्यामंदिर
भगूर येथील ति. झं. विद्यामंदिर शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे रमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.परीक्षेत यश संपादन करणाऱ्या धनश्री धापेकर, आरती सांगळे, मयुरी वाघ,अभिषेक मोरे, चैताली चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
ब्रह्मानंद म्युझिक अकॅडमी
ब्रम्हानंद म्युझिक अकॅडमीत गुरुपौर्णिमेनिमित्त शास्त्रीय संगीताची जुगलबंदी रंगली. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश गिते उपस्थित होते. तबल्याची साथ संदीप भडांगे यांनी दिली. यावेळी गितेश बुऱ्हाडे, विजया मराठे, ज्ञानेश्वर साबळे, अभिजित राऊत, राजेद्र अग्रवाल, भगवान पवार यांनी शास्त्रीय गीते सादर केली.