मालेगावसह परिसरात गुरुपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST2021-07-24T04:10:54+5:302021-07-24T04:10:54+5:30

भारत विद्यालय मालेगाव : कॅम्पातील भारत विद्यालयात मुख्याध्यापिका कल्पना अहिरे यांनी प्रतिमापूजन केले. त्यांनी लोकमान्य टिळकांविषयी माहिती ...

Gurupournima celebrations in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात गुरुपौर्णिमा साजरी

मालेगावसह परिसरात गुरुपौर्णिमा साजरी

भारत विद्यालय

मालेगाव : कॅम्पातील भारत विद्यालयात मुख्याध्यापिका कल्पना अहिरे यांनी प्रतिमापूजन केले. त्यांनी लोकमान्य टिळकांविषयी माहिती दिली. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------------

एलव्हीएच शाळा कॅम्प

मालेगाव कॅम्पातील एलव्हीएच विद्यालयात गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. सावंत होते. शिक्षक जे. एच. सावकार, पी.के. ठाकूर, मुख्याध्यापक सावंत यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन के.आर . सूर्यवंशी यांनी केले, तर श्रीमती बी.एम अहिरे यांनी आभार मानले.

-------------------

आरबीएच कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प

मालेगाव : कॅम्पातील आरबीएच कन्या विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमिला पाटील होत्या. त्यांनी मार्गदर्शन केले.

-----------------

टीकेआरएच विद्यालय, निमगाव

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील टीकेआरएच विद्यालयात गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षक आर.ए.पवार होेते. यावेळी मुख्याध्यापक व्ही.एस. पगार, उपमुख्याध्यापक के.डी. दाभाडे, सूत्रसंचलन बी. बी. अहिरे यांनी केले, तर आभार आर.आर. शिंदे यांनी मानले. या विद्यार्थिनींची भाषणे झाली.

Web Title: Gurupournima celebrations in the area including Malegaon