जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:27+5:302021-07-24T04:11:27+5:30

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपा पात्र शिष्य परम श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ...

Gurupourni at Janardhan Swami Ashram | जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपौर्णिमा

जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपौर्णिमा

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे विशेष कृपा पात्र शिष्य परम श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सकाळी सहा वाजता नित्यनियम विधी, भूपाळी, गुरूचरित्र पर सत्संग प्रवचन आणि आरती असे नित्य नियम कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता बाबाजींच्या महानिर्वाण स्थानी परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते पादुका पूजन, पाद्यपूजा, समाधी पूजा महाभिषेक विधीवत पद्धतीने साजरा झाला.

इन्फो बॉक्स

ऑनलाइन पूजन

दरवर्षी गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, मात्र देशभरात कोरोना विषाणू संकट

असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी नियम पालन करून साजरे करण्यात आले. भाविकांसाठी कार्यक्रम सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून गुरुबंधू भाविकांना घरबसल्या पाहण्याची व्यवस्था आश्रमातर्फे केली होती.

Web Title: Gurupourni at Janardhan Swami Ashram