श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुरुपूजन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:22+5:302021-09-02T04:29:22+5:30

सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील भाविकांनी या गुरुपूजन सोहळ्यास हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य ओंकारव्यास बाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ...

Gurupoojan ceremony on the occasion of Shrikrishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुरुपूजन सोहळा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गुरुपूजन सोहळा

सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील भाविकांनी या गुरुपूजन सोहळ्यास हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य ओंकारव्यास बाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अभिषेक, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी प्रभू एकमुखी दत्ताच्या प्रतिमेचे तसेच पादुकांचे विधिवत पूजन करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. या सोहळ्यानिमित्त मंदिराची फुलांनी व विद्युत रोशनाईने सजावट करण्यात आली होती. यावेळी परिसरातील तसेच जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून हजेरी लावली होती. यानंतर भाविकांची गुरुवर्य ओंकारव्यास बाबा (चक्रपाणी बाबा) यांना चांदीचा मुकुट देत विधिवत गुरुपूजन केले. यानंतर चक्रपाणी महाराज यांनी भाविकांना महानुभाव पंथाच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. आरती व महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी बाळू पागेरे, विजय गायकर, नामदेव गायकर, परसराम गायकर, कैलास पागेरे, रघुनाथ पागेरे, दशरथ पागेरे, भास्कर पागेरे, रमेश पागेरे, किशोर पागेरे, नीलेश पागेरे, भगवान खादवे, समाधान पागेरे, सुनील पागेरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

छायाचित्र - ३१ नांदूरवैद्य २

नांदगाव बुद्रुक येथे महानुभाव पंथाचे गुरुवर्य ओंकारव्यास बाबा यांचे चांदीचा मुकुट देत गुरुपूजन करताना भाविक.

310821\31nsk_9_31082021_13.jpg

नांदगाव बुद्रुक येथे  महानुभाव पंथाचे गुरूवर्य ओंकारव्यास बाबा यांचे चांदीचा मुकूट देत गुरूपूजन करतांना भाविक.

Web Title: Gurupoojan ceremony on the occasion of Shrikrishna Janmashtami