गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:45 PM2020-05-24T22:45:27+5:302020-05-24T22:45:43+5:30

विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.

Guru, the time of famine on the priest brothers | गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

गुरव, पुजारी बांधवांवर उपासमारीची वेळ

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : विविध सामूहिक सोहळ्यांना बंदी

ब्राह्मणगाव : विवाह सोहळा, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती आदी शुभकार्य म्हटले की, मंगल स्वर कानी पडावे म्हणून मंगल वाद्याची आठवण येते. मात्र सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने मंगलवाद्य वाजविणाऱ्या गुरव समाजबांधवांसह पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
मंगल वाद्य वाजवणे, घरोघरी जाऊन बिल्वपत्र वाटणे, फुलहार विकणे, गाव, शहरातील शिव मंदिरांत पूजा व साफसफाई करणे अशी कामे गुरव समाजबांधव करतो. त्यामुळे मिळणाºया पैसांवर त्याचा उदरविर्नाह चालतो. परंतु कोरोनाच्या संकटकाळात मंदिरे व विविध सोहळे व इतर सोहळ्यांना बंदी असल्याने चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न या वर्गाला पडला आहे. कोरोनामुळे उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढे मोठे संकट आल्याने आम्ही भांबावले आहोत. भविष्याची कोणतीही आर्थिक तरतूद नाही. गेल्या दोन अडीच महिन्यांपासून संकटाला तोंड द्यावे लागत आहे. भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असे मंगल वाद्य वाजवणारे शरद गुरव यांनी सांगितले.
लग्नसराई म्हटली की मंगलवाद्याला मागणी असते. सनई-चौघडा असला की विवाह सोहळ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. मात्र मार्च महिन्यापासून लॉकडाउन असल्याने विवाह सोहळे थांबले आहेत. सर्व अर्थकारण ठप्प झाले आहे. व्यवसाय बंद पडल्यामुळे गुरव समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे बंद केल्याने मंदिराबाहेरील सर्वच लहान-मोठी दुकाने बंद झाली आहेत.
फूलमाला, बिल्वपत्र वाटणेही बंद झाल्याने सर्वच आवक बंद झाली आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शासन आदेशामुळे ठरावीक लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पाडली जात आहेत. मंगलवाद्य वाजविण्यासाठी परवानगी दिल्यास आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकेल, अशी भावनाही शरद गुरव यांनी व्यक्त केली.
बेलपत्र वाटणे, मंदिराची साफसफाई, दिवाबत्ती आदी कामे आम्ही करतो. सध्य कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने ही कामे बंद आहेत. दोन पैसे मिळण्यासाठी शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी.
- शरद गुरव

Web Title: Guru, the time of famine on the priest brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.