शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गुरु नानकजींची ५५०वी जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:48 AM

श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले.

नाशिक : श्री गुरुनानक देवजी सेवाच्या वतीने श्री गुरुनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडले. कीर्तन,भजन, प्रवचन आणि श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाच्या अखंड पाठचीही सांगता झाल्यानंतर लंगरसह प्रसादाचे वितरण करण्यात आले.शहरातील शीख बांधवांकडून भक्तिमय वातावरणात फेरीच्या आयोजनासह अखंड पाठ, शबद कीर्तन तसेच लंगरचे आयोजन करण्यात आले होते. गुरुद्वारांच्या वतीने विविध व्यवस्थापन समित्यांनी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यासाठी गुरुद्वारांमध्ये देशाच्या अन्य भागांमधून कीर्तनी जथ्थे दाखल झाले होते. तसेच विविध कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रभात फेरी, अखंड पाठ, कीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभरापासून दररोज शहरातील देवळाली कॅम्प, नाशिकरोड, शिंगाडा तलाव,पंचवटी, हिरावाडी येथील गुरुद्वारांनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक जयंतीनिमित्त महानगरातील हजारो शिखबांधव महानगरातील गुरुद्वारांमध्ये सहभागी झाले होते. तसेच गुरुद्वारांना रोषणाईने सजविण्यात आले आहे. शिंगाडा तलावच्या गुरुद्वारामध्ये तर गुरुद्वाराच्या बाहेरदेखील भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा कॅम्प, मॅमोग्राफी शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रमदेखील वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात ओमवीर सिंग, प्रभलीन कौर आणि जगदीपसिंग या कीर्तनी जथ्थ्याने विविध भजने आणि कीर्तने सादर करीत सेवा अर्पण केली.प्रदूषणविरहित उत्सववायु हा गुरू, पाणी हा पिता आणि धरती ही आई असल्याचे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे या तिघांची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, अशाच प्रकारे उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय सर्व गुरुद्वारा प्रबंधक समित्यांनी घेतला होता. त्यानुसार स्वच्छतेवर भर देत फटाक्यांविना आणि प्रदूषणविरहित उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.श्री गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मीयांचा सर्वोच्च पवित्र ग्रंथ मानल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिबच्या पठणाला तीन दिवसांपूर्वीच प्रारंभ करण्यात आला होता. तीन दिवस त्याचे पठण झाल्यानंतर मंगळवारी सकाळी या पाठाची समाप्ती करण्यात आली. या ग्रंथामध्ये श्री गुरु नानकजी यांच्या वचनांचा अंतर्भाव आहे. पठणाचा समारोप झाल्यानंतर आरती करुन अखंड पाठाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक