गोळ्या झाडून सराईत गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:32 IST2017-08-18T00:31:46+5:302017-08-18T00:32:03+5:30

दिंडोरीरोेडवरील पोकार कॉलनीजवळ असलेल्या कलानगरमध्ये भर रस्त्यात नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे या सराईत गुन्हेगाराची अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्या

 Gunshot kill | गोळ्या झाडून सराईत गुंडाची हत्या

गोळ्या झाडून सराईत गुंडाची हत्या

पंचवटी : दिंडोरीरोेडवरील पोकार कॉलनीजवळ असलेल्या कलानगरमध्ये भर रस्त्यात नीलेश उर्फ बाला मनोहर मोरे या सराईत गुन्हेगाराची अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्या केल्याची घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काही वर्षांपूर्वी झालेल्या भगवान सानप व गुनाजी जाधव यांच्या खुनप्रकरणातील संशयित नीलेश हा त्याच्या ‘हॅप्पी गेम झोन’ नावाच्या दुकानाजवळ बसलेला असताना तीन ते चार हल्लेखोरांनी येऊन त्याच्यावर हल्ला चढविला. ज्या परिसरात काही वर्षांपूर्वी सानपवर हल्ला झाला त्याच भागात त्याचा खून करण्यात आला. हल्लेखोरांनी सुरुवातीला धारदार शस्त्रांनी वार करून त्यास जखमी केले त्यानंतर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. घटनास्थळी पोलिसांना दोन काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मोरे यास पोलिसांनी व परिसरातील युवकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास तपासून मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम देशमुख आदिंनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रण मिळविले.

Web Title:  Gunshot kill