उमराणेत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:19 IST2021-03-10T22:41:26+5:302021-03-11T01:19:24+5:30
उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१२) होत असलेल्या मतदानासाठी बुधवारी (दि. १०) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे आता उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठींवर भर द्यायला सुरुवात केली आहे.

उमराणेत प्रचाराच्या तोफा थंडावल्या
उमराणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१२) होत असलेल्या मतदानासाठी बुधवारी (दि. १०) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे आता उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठींवर भर द्यायला सुरुवात केली आहे.
दोन महिन्यांपासून बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवारी प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान, दि.१२ रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारी मतदान प्रक्रिया होऊन लगेचच सायंकाळी मतमोजणी होणार आहे.