तीन ताल आणि सप्तकांचा गुंजला ठेका
By Admin | Updated: October 14, 2015 23:21 IST2015-10-14T23:20:46+5:302015-10-14T23:21:47+5:30
तीन ताल आणि सप्तकांचा गुंजला ठेका

तीन ताल आणि सप्तकांचा गुंजला ठेका
नाशिक : धा धिन् धिन् धा असा तीन तालाचा ठेका धरत तब्बल १२० बाल तबलजींनी तबला सहवादनाचा आविष्कार सादर केला. शारदीय नवरात्रोत्सव अंतर्गत बुधवार (दि. १४) लवाटेनगर येथील श्री निर्मल महालक्ष्मी मंदिरात ‘अनुभूती’ या नितीन वारे आणि नितीन पवार यांच्या संकल्पनेतून सामूहिक तबला वादनाचे आयोजन करण्यात आले होते.सामूहिक बलावादनाच्या कार्यक्रमात तीन ताल, सप्तक, झपताल आदि तालांचे सादरीकरण केले. यावेळी १२० वादकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. या वादकांना सुजित काळे यांनी हार्माेनियमवर साथ दिली. यावेळी गौरव तांबे, दिगंबर सोनवणे, अमित भालेराव, जयेश कुलकर्णी, रसिक कुलकर्णी यांच्यासह पालकवर्ग आणि देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)