पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्दच्या सरपंचपदी कविता कैलास गुंजाळ यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली आहे.माजी सरपंच ललिता अशोक डोंगरे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सरपंचपद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. एस. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी कविता कैलास गुंजाळ, मंगल नामदेव बेंडकुळे, जयश्री बाबासाहेब चिने या तीन महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. गुप्त मतदानात सौ. गुंजाळ व सौ. बेंडकुळे यांना प्रत्येकी तीन, तर सौ. चिने यांना दोन मते मिळाली. दोन उमेदवारांना सारखी मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने सरपंच निवडीचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी साबळे यांनी घेतला.रुकसाना सय्यद या लहान मुलीच्या हातून चिठ्ठी उचलण्यात आली. त्यात कविता गुंजाळ यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी साबळे यांनी गुंजाळ यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा केली.
पाथरे खुर्दच्या सरपंचपदी गुंजाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:57 IST
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्दच्या सरपंचपदी कविता कैलास गुंजाळ यांची चिठ्ठी पद्धतीने निवड झाली आहे. माजी सरपंच ललिता अशोक डोंगरे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून सरपंचपद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. एस. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
पाथरे खुर्दच्या सरपंचपदी गुंजाळ
ठळक मुद्देलहान मुलीच्या हातून चिठ्ठी उचलण्यात आली.