गुळवंच होणार कॅशलेस
By Admin | Updated: January 21, 2017 23:03 IST2017-01-21T23:03:13+5:302017-01-21T23:03:30+5:30
मनोजकुमार खैरनार : कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन

गुळवंच होणार कॅशलेस
गुळवंच : कॅशलेस होण्याच्या दिशेने गुळवंचची वेगाने वाटचाल सुरू असून, सिन्नर तालुक्यातील हे पहिले कॅशलेस गाव ठरणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी केले. येथील आयडीबीआय बॅँकेच्या कॅशलेस व्हॅनचे उद्घाटन खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सरपंच कविता सानप, शाखा व्यवस्थापक सादीक अली अल्लारखिया, सहाय्यक व्यवस्थापक अमेय डोंगरे, केशव कांगणे, भाऊसाहेब ताडगे, भगवान सानप, पांडुरंग सानप आदि उपस्थित होते. गुळवंच हे गाव आयडीबीआय बॅँकेने दत्तक घेतले असून, ग्रामस्थांना कॅशलेस व्यवहार व मोबाइल अॅप वापराबाबत बॅँकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांनी बॅँकेत खाते उघडण्याचे आवाहन अली यांनी केले. जलदगती व्यवहारासाठी मोबाइल अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी विष्णू सानप, बाळाजी कांगणे, विठ्ठल काकड, नितीन उगले, नीलेश उगले, नितीन कांगणे, नामदेव सानप, संदीप सानप आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)