गुजरातच्या मनोरूग्ण महिलेला मिळाले मायेचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:56 PM2019-10-04T14:56:04+5:302019-10-04T14:56:15+5:30

देवळा : तालुक्यातील मटाणे गावात बेवारस फिरणाऱ्या एका मनोरु ग्ण महिलेच्या कुटुंबियांचा तातडीने शोध घेउन तिला त्यांच्या स्वाधीन करु न देवळा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

Gujarat psychiatric woman receives an umbrella of maya | गुजरातच्या मनोरूग्ण महिलेला मिळाले मायेचे छत्र

गुजरातच्या मनोरूग्ण महिलेला मिळाले मायेचे छत्र

Next

देवळा : तालुक्यातील मटाणे गावात बेवारस फिरणाऱ्या एका मनोरु ग्ण महिलेच्या कुटुंबियांचा तातडीने शोध घेउन तिला त्यांच्या स्वाधीन करु न देवळा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
मटाणे शिवारात दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी दावल पवार या शेतकºयाच्या शेतातील शेडमध्ये ही महिला येउन बसली. घरातील व्यक्तींनी या महिलेची विचारपूस केली असता ती काहीच बोलत नव्हती. ही महिला मनोरूग्ण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी या महिलेला इतरत्र जाऊ न देता तेथे थांबवून ठेवले, तिच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.मटाण्याचे उपसरपंच भाऊसाहेब अहेर यांनी सदर महिलेबाबत देवळा पोलिसांना कळविले. सहा. पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपुत, सहा. पोलिस उपनिरीक्षक आर. एम. राठोड, व्ही.बी. बर्डे यांनी मटाणे येथे जावुन त्या मनोरु ग्ण महिलेला ताब्यात घेतले. सदर बाबत तेथील रहिवासी यांचे सविस्तर जबाब नोंदविले. सदर घटने बाबत नासिक ग्रामीण पोलिस अधिक्षक आरती सिंग, अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर मनोरु ग्ण महिलेस मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक यांचे न्यायालयात हजर केले असता सदर मनोरु ग्ण महिलेस वैद्यकीय उपचारासाठी नाशिक जिल्हा रु ग्णालय येथे दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. सदर महिलेस जिल्हा रु ग्णालय येथे दाखल करण्यात आले. ह्या मनोरु ग्ण मिहलेवर वैद्यकीय अधिकारी गोपाल घोडके यांनी उपचार केले. प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी तिचे सोबत संवाद साधुन तिला बोलते केले असता तिचे नाव मैनुबेन महाला असे असल्याचे व ती गुजरात राज्यातील राहणारी असल्याचे तिचे बोलीभाषेवरु न समजुन आले. पोलिसांनी तपासाची चक्र े फिरवून गुजरात राज्यातील पोलिसांशी संपक; साधुन सदर महिले बाबत माहिती मिळवली असता सदर महिला वाजदा पोलीस स्टेशन हद्दीतील राहणार असल्याचे समजुन आले. तसेच तिचे कुटुबिय मुले हेमंत प्रभुभाई महाला, व विमल प्रभुभाई महाला, (रा. उमरकुई, ता. वाजदा, जिल्हा. बलसाड ) यांचेशी संर्पक साधुन त्यांना सदर महिले बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दि. १ सप्टेंबर रोजी सदर महिला मैनुबेन प्रभुभाई महाला हिचे वारस मिळुन आल्याने तसेच तिचे प्रकृतित सुधारणा दिसुन आल्यानंतर या महिलेला न्यायालयात हजर केले असता नातेवाईकां बाबत खात्री करु न तिला नातेवाईकांचे ताब्यात देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले. यानंतर देवळा पोलिसांनी हया महिलेस तिचे नातेवाईकांचे ताब्यात दिले.

Web Title: Gujarat psychiatric woman receives an umbrella of maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक