गुजरात पोलिसांनी नाशकातून आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:04+5:302021-09-04T04:19:04+5:30

नाशिक : गुजरात पोलिसांनी नाशिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाशिकमध्ये मोठी कारवाई करत गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमाच्या गोशाळेतील ...

Gujarat police nabs absconding accused from Nashik | गुजरात पोलिसांनी नाशकातून आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या

गुजरात पोलिसांनी नाशकातून आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या

नाशिक : गुजरात पोलिसांनी नाशिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता नाशिकमध्ये मोठी कारवाई करत गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमाच्या गोशाळेतील संचालक संजीव किशनकुमार वैद (४४) याला अटक केली आहे. त्यामुळे काही वेळासाठी संजीव वैद यांचे अपहरण झाल्याचा समज पसरल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात वैद याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या गुन्ह्याच्या तपासात संजीव वैद हा गुजरातमधील १२ वर्षांपासून फरार आरोपी असून त्याचे अपहरण नव्हे, तर गुजरात पोलिसांनी त्याच्या नाशकातून अटक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आसाराम बापू आश्रमशाळेच्या गो शाळेतील जनावरांना खाद्य घेण्यासाठी संजीव वैद पंचवटीतील सेवाकुंज येथे नागसेठिया पशुखाद्य दुकानात गेला होता. यावेळी गुजरात पोलीसही त्याच्या मागावार होते. संधी मिळताच त्यांनी संजीव वैद्यच्या मुसक्या आवळल्या; परंतु, या घटनेचा नाशिक पोलिसांना सुगावाही नव्हता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोशाळेतील वैद याचे सहकारी राजेश चांद्रकुमार डावर यांनी इनोव्हा कारमधून आलेल्या चौघा जणांनी भरदिवसा संजीव वैदचे अपहरण केल्याची फिर्याद पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार अपहरणाच्या गुन्ह्यात तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रोहीत केदार यांनी घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच तपास पथकाला दोन गटांत विभागून वाहनाचा शोध घेण्याकरता घोटी टोलनाका तसेच शिंदे पळसे टोल नाका येथे वाहनाचा माग घेतला. या तपासादरम्यान अपहृत संजीव वैद हा साबरमती पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात बारा वर्षापासून फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखे सोबत संपर्क करून या माहितीची नाशिक पोलिसांनी पडताळणी करून घेतली असून संजीव वैद याच्यावर साबरमती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व शस्त्रास्त्र कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल असून या गुन्ह्यांत तो मागील १२ वर्षांपासून फरार होता. अखेर गुजरात पोलिसांनी त्याला नाशिक येथून ताब्यात घेतन्याचे स्पष्ट केले आहे.

अपहरण झाल्याचा गैरसमज

संजीव वैद्य पंचवटीतील सेवाकुंज येथे नागसेठिया पशुखाद्य दुकानात गेलेल्या संचालक संजीव वैद (४४) या ला गुजरात पोलिसांच्या चार सदस्यीय पथकाने अटक केली; परंतु, आश्रमाचे राजेश चांद्रकुमार डावर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघाजणांनी भरदिवसा संजीव वैदचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. त्यामुळे आश्रमातील डावर यांचा अपहरण झाल्याचा गैरसमज झाला की आश्रमातील संजीव वैद यांच्या सहकाऱ्यांकडून अपहण झाल्याची चुकीची माहिती पोलिसांना देण्यात आली याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

Web Title: Gujarat police nabs absconding accused from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.