जीएसटी चर्चासत्रात उद्योजकांना मार्गदर्शन

By Admin | Updated: June 28, 2017 00:40 IST2017-06-28T00:13:47+5:302017-06-28T00:40:18+5:30

सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात डेव्हलपमेंट आॅफ सिंगापूर, मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स व स्टाईसच्या वतीने वस्तू-सेवा-कर प्रणाली चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.

Guidelines for entrepreneurs in the GST conference | जीएसटी चर्चासत्रात उद्योजकांना मार्गदर्शन

जीएसटी चर्चासत्रात उद्योजकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या सभागृहात डेव्हलपमेंट आॅफ सिंगापूर, मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स व स्टाईसच्या वतीने आयोजित वस्तू-सेवा-कर प्रणाली (जीएसटी) चर्चासत्रात उद्योजक, व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या कराची पद्धत, अनेक करांऐवजी एकच कर, व्यापार-निर्यात व गुंतवणुकीसाठी अनुकूल करप्रणाली, सोपी सुटसुटीत व पारदर्शक पद्धत आदी मुद्द्यांना धरून सनदी लेखापाल चेतन बंब व सचिन तोष्णीवाल यांनी उद्योजकांना सविस्तर माहिती दिली. संपूर्ण भारतात एक किमती व कररचना कशी असेल, एक टॅक्स-एक रिटर्न, एकाच कार्यालयाशी संपर्क अशा मुद्द्यांसोबत प्रोजेक्टरवर पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे टॅली सॉफ्टवेअरमधून बॅँकेत कसे व्यवहार करावेत याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या सुरुवातीस चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित बंब, तोष्णीवाल व डीबीएस बॅँकेचे शाखाधिकारी सातपुते यांचा स्टाईसचे अध्यक्ष अविनाश तांबे, उपाध्यक्ष किशोर देशमुख, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष तांबे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष देशमुख यांनी आभार मानले.   याप्रसंगी स्टाईसचे संचालक प्रभाकर बडगुजर, पंडित लोंढे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, उद्योजक प्रदीप पाटील, अतुल अग्रवाल, अलोक दास, कृष्णा बाकळे, प्रकाश रहाटळ, शुक्लेश्वर वर्पे, जालिंदर शेळके, सखाराम वाडकर, अनिल असावा, पुतीत बन्सल, नितीन नागपूरकर, अमित बन्सल, दीपक वर्पे, ओमप्रकाश शिरापुरे, सुभाष गायकवाड, नरेंद्र जोशी आदींसह उद्योजक उपस्थित होते.

Web Title: Guidelines for entrepreneurs in the GST conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.