पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

By Admin | Updated: July 2, 2015 00:08 IST2015-07-02T00:07:49+5:302015-07-02T00:08:03+5:30

पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

Guide guide to the tourism corporation's youth | पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे. या औचित्यावर शहरात कोट्यवधी भाविकांसह विदेशी पर्यटकदेखील दाखल होणार आहे. त्यानिमित्त पर्यटकांना ‘नाशिक दर्शन’ घडावे, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सुशिक्षित तरुणांना ‘गाईड’चे प्रशिक्षण देणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०१५ यशस्वीपणे पार पडावा, यानिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वच शासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रामकुंडापासून त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तापर्यंत विविध विकासकामे युध्दपातळीवर पूर्ण केली जात आहे. कुंभमेळ्याच्या ब्रॅण्डिंगसाठी पर्यटन महामंडळानेदेखील पुढाकार घेतला असून देशभरात सुमारे साठ ठिकाणी जाहिरात फलक महामंडळ उभारणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर, नाशिक परिसरातील विविध धार्मिक स्थळांची माहिती व सखोल शास्त्रोक्त अभ्यास असणाऱ्या व पर्यटनाची आवड असलेल्या होतकरू आठवी ते बारावीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना ‘गाईड’चे प्रशिक्षण पर्यटन महामंडळाकडून दिले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी दिली आहे.
ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटन विषयक माहिती-ज्ञान अवगत करण्याची आवड तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि उत्तम संभाषण कौशल्य असणाऱ्या तरुणांसाठी स्वयंरोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. महामंडळाकडून मुलाखतीद्वारे ‘गाईड’ अर्थात पर्यटक मार्गदर्शक म्हणून संबंधितांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या सर्व तरुणांना गाईडचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी गुरुवार (दि.२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, नाशिककडे समक्ष अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Guide guide to the tourism corporation's youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.