येवल्यातील पैठणी कारागिरांना मार्गदर्शन
By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:25:39+5:302014-07-14T00:29:11+5:30
येवल्यातील पैठणी कारागिरांना मार्गदर्शन

येवल्यातील पैठणी कारागिरांना मार्गदर्शन
येवला : पैठणी विणकरांना विणकामात सुलभता यावी व अल्पखर्ची तंत्रातून पैठणी विणकाम करता यावे या हेतूने केंद्रीय रेशीम बोर्ड मार्गदर्शन शिबिर कॅम्पचे आयोजन येवल्यात करण्यात आले होते.
येथील शाकंभरी हातमाग व हस्तकला विणकर औद्योगिक सहकारी संस्थेने विणकरांसाठी या कॅम्पचे आयोजन केले होते. केंद्रीय रेशीम बोर्डचे कोल्हारकर, त्यागराजन (कोईम्बतूर) व जाधव यांनी या कॅम्पमध्ये उपस्थित विणकरांना प्रशिक्षण व माहिती दिली.
पैठणी विणकरांना अल्पदरात जेकॉर्ड (डिझाईन) डॉबी, वाईडिंग क्रिया, कांडी भरण्याचे मशीन, कार्ड पंचिंग मशीन, न्यूमॅटिक कॉम्प्रेसर हे साहित्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी संस्थापक पातळीवर अर्ज करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश खेळकर यांनी विणकरांना शासनाच्या वतीने हातमाग अल्पदरात उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या कार्यक्रमास शहरातील साळी, कोष्टी, क्षत्रिय, नागपुरे आदि समाजातील विणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)