पेठ : ग्रामोदय ते भारत उदय अभियानांतर्गत रविवार असूनही गावात एकाच वेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या, तर पंचायत राज दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामसभांना मार्गदर्शनही केले.सकाळपासूनच प्रत्येक गावात दूरचित्रवाणी संच, वीज नसेल तर रेडिओ आदि साधनांची ग्रामसेवक व क्षेत्रीय अधिकारी जुळवाजुळव करताना दिसून येत होते. ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर किंवा शाळेच्या आवारात गावातील आबालवृद्ध नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र जमले होते. पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायतीस एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. गटविकास अधिकारी बी. बी. बहिरम, विस्तार अधिकारी पवार, पाडवी, सादवे आदिंनी भेटी देऊन पाहणी केली. (वार्ताहर)
पंतप्रधानांचे रेडिओद्वारे ग्रामसभांना मार्गदर्शन
By admin | Updated: April 24, 2016 23:03 IST