पंतप्रधानांचे रेडिओद्वारे ग्रामसभांना मार्गदर्शन

By Admin | Updated: April 24, 2016 23:03 IST2016-04-24T23:00:36+5:302016-04-24T23:03:22+5:30

पेठ : ७४ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा

Guidance for Gram Sabhas by PM's Radio | पंतप्रधानांचे रेडिओद्वारे ग्रामसभांना मार्गदर्शन

पंतप्रधानांचे रेडिओद्वारे ग्रामसभांना मार्गदर्शन

पेठ : ग्रामोदय ते भारत उदय अभियानांतर्गत रविवार असूनही गावात एकाच वेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या, तर पंचायत राज दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामसभांना मार्गदर्शनही केले.
सकाळपासूनच प्रत्येक गावात दूरचित्रवाणी संच, वीज नसेल तर रेडिओ आदि साधनांची ग्रामसेवक व क्षेत्रीय अधिकारी जुळवाजुळव करताना दिसून येत होते. ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर किंवा शाळेच्या आवारात गावातील आबालवृद्ध नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र जमले होते. पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायतीस एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. गटविकास अधिकारी बी. बी. बहिरम, विस्तार अधिकारी पवार, पाडवी, सादवे आदिंनी भेटी देऊन पाहणी केली. (वार्ताहर)

Web Title: Guidance for Gram Sabhas by PM's Radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.