कृषीदूतामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:04+5:302021-07-19T04:11:04+5:30
येत्या काळात बीजप्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, फळबागांची निगा राखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल असे देशमुख ...

कृषीदूतामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
येत्या काळात बीजप्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, फळबागांची निगा राखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल असे देशमुख यांनी सांगितले. तसेच आधुनिक व किफायतशीर शेती व्यवसायाबाबत माहिती दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड येथील कृषीदूत म्हणून चैतन्य देशमुख कार्यक्रम राबवित आहेत. यावेळी एकात्मिक तण व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. याप्रसंगी सुरेगावचे सरपंच संतोष देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, उत्तम देशमुख, अभिजीत देशमुख, शुभम देशमुख, आदेश देशमुख, लखन खाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलक, डॉ. अरविंद हारदे, प्रा. निलेश तायडे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.
फोटो - १८ सिन्नर कृषिदूत
सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषीदूत चैतन्य देशमुख व उपस्थित शेतकरी.
180721\18nsk_7_18072021_13.jpg
फोटो - १८ सिन्नर कृषिदूत सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषीदूत चैतन्य देशमुख व उपस्थित शेतकरी.