खरिपाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:22+5:302021-05-30T04:13:22+5:30
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची पेरणी करावी. बियाणास जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया, डाळवर्गीय ...

खरिपाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर करून सोयाबीन या पिकाची पेरणी करावी. बियाणास जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया, डाळवर्गीय पिकासाठी व एकदल वर्गीय पिकासाठी बीजप्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर दहा टक्के कमी करून खर्चात बचत करावी. शेतकऱ्यांना त्यांचे बांधावर खते कसे उपलब्ध करून घेता येईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर व सलग फळबाग लागवड, तसेच याच योजनेअंतर्गत शेततळे खोदकाम व प्लास्टिक अस्तरीकरण याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, मंडळ कृषी अधिकारी डी. आर. नाठे, कृषी पर्यवेक्षक पी. बी. कनहोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके करण्यात येत आहे.
-----------------
दिंडोरी तालुका कृषी विभागाच्यावतीने खेडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून दिली. त्याप्रसंगी कृषी सहाय्यक अस्मिता अहिरे व शेतकरी. (२९वरखेडा)
===Photopath===
290521\29nsk_18_29052021_13.jpg
===Caption===
२९ वरखेडा