मानोरी येथे कृषिदूतांंकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:44+5:302021-07-17T04:12:44+5:30

श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाडचे विद्यार्थी कृषिदूत योगेश राजेंद्र बैरागी यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभच्या अभ्यास दौऱ्याचा ...

Guidance to farmers from agricultural envoys at Manori | मानोरी येथे कृषिदूतांंकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मानोरी येथे कृषिदूतांंकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाडचे विद्यार्थी कृषिदूत योगेश राजेंद्र बैरागी यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभच्या अभ्यास दौऱ्याचा आरंभ केला. कृषिदूत योगेश बैरागीने मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना कोरोना महामारीविषयी सुरक्षिततेचे उपाय, काळजी आणि कोविड लसीकरण जनजागृती केली. त्याच बरोबर हवामान आधारित शेती, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, एकात्मिक तण, कीड व रोग व्यवस्थापन, चारा साठवणूक व प्रक्रिया, पीक व पाणी व्यवस्थापन, फवारणी पद्धतीने आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मानोरी गावच्या सरपंच उषा सांगळे, कृषी सहाय्यक रूपाली लावरे, रमेश सानप, गणेश चकणे, भाऊसाहेब नवले आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी साहेबराव नवले, डॉ. अशोक कडलक, डॉ. अरविंद हारदे, प्रा. नीलेश तायडे आणि कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

--------------------------

सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे कृषिदूत योगेश बैरागी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी सरपंच उषा सांगळे, रूपाली लावरे, रमेश सानप, गणेश चकणे, भाऊसाहेब नवले आदी. (१६ मानोरी)

160721\16nsk_2_16072021_13.jpg

१६ मानोरी 

Web Title: Guidance to farmers from agricultural envoys at Manori