सीडीए संस्थेतर्फे मार्गदर्शन शिबिर
By Admin | Updated: June 1, 2014 01:14 IST2014-05-31T23:27:28+5:302014-06-01T01:14:27+5:30
नाशिक : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यश मिळावे यासाठी करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीतर्फे शिबिर घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सीडीएच्या अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.

सीडीए संस्थेतर्फे मार्गदर्शन शिबिर
नाशिक : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यश मिळावे यासाठी करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीतर्फे शिबिर घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सीडीएच्या अनेक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे.
सीडीए हे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे केंद्र असून, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणार्या मानसिकतेला घडविणारी संस्था आहे. परीक्षाभिमुख नियोजन, अद्यावत नोट्स, सराव पेपर, ग्रंथालय, इंटरनेटची सोय व अनुभवी प्राध्यापकवृंद ही सीडीए मार्गदर्शन केंद्राची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवारी (दि. १) दुपारी ११ ते २ या वेळेत परशुराम सायखेडकर नाट्यगृह याठिकाणी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.