ताळेबंद तयार करण्याबाबत आयमातर्फे मार्गदर्शन
By Admin | Updated: May 10, 2015 23:59 IST2015-05-10T23:51:47+5:302015-05-10T23:59:56+5:30
ताळेबंद तयार करण्याबाबत आयमातर्फे मार्गदर्शन

ताळेबंद तयार करण्याबाबत आयमातर्फे मार्गदर्शन
सातपूर : वर्किंग कॅपिटल महत्त्वाचे असल्याने उद्योजकांनी आपले ताळेबंद तयार करताना त्यात बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा. दीपाली चांडक यांनी केले.
‘ताळेबंद (बॅलेन्सशीट) कसे तयार करावे’ या विषयावर आयमाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. दीपाली चांडक यांनी सांगितले की, गुंतवणुकीचा थेट संबंध बॅलन्सशिटशी आहे. आपण शेअर्स खरेदी करताना जशी काळजी घेतो तशीच काळजी बॅलन्सशिट तयार करताना घ्यावी. त्याचप्रमाणे बॅलन्सशिट कसे तयार करावे, त्यातील नोंदी, वर्किंग कॅपिटल, फिक्स अॅसेट करंट अॅसेट याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक नीलिमा पाटील यांनी केले. आयमा सेमिनार समितीचे अध्यक्ष सौमित्र कुलकर्णी यांनी कार्यशाळा आयोजनाचा उद्देश विषद केला. यावेळी व्यासपीठावर आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, ज्ञानेश्वर गोपाळे आदि उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दीपाली चांडक यांनी समर्पक उत्तरे दिलीत. यावेळी उमेश कोठावदे, ललित बूब, एन. डी. ठाकरे, अनिल डिंगरे, जगदीप पाटील, दिलीप वाघ आदिंसह उद्योजक उपस्थित होते. सूत्रसंचालक गौरी कुलकर्णी यांनी केले. राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.