शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

खालपफाटा शाळेत पाहुणा आला फळा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:21 IST

लोहोणेर : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे प्रयोग राबवीत आहेत. लोहोणेर शिवारातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ह्यपाहुणा आला फळाह्ण या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनोखा प्रयोग

लोहोणेर : कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे प्रयोग राबवीत आहेत. लोहोणेर शिवारातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ह्यपाहुणा आला फळाह्ण या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.सूर्यवंशी यांच्या एज्युकेशन ऑन व्हीलस या उपक्रमाचेही याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले. शिक्षक ऑनलाइन शिक्षणासाठी निरनिराळे प्रयोग राबवीत असताना गरीब, आदिवासी, मजूर पालकांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणाची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अशा मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सूर्यवंशी यांनी वस्तीवरील फळे रंगवून प्रत्यक्ष तेथे जाऊन अध्यापनाचे काम गेले वर्षभर सुरू ठेवले. यावर्षीदेखील कोरोनाच्या साथीमुळे शाळा उघडल्या नाहीत. अशा वेळेस मुलांच्या शिक्षणातील उणीव भरून काढण्यासाठी सूर्यवंशी यांनी ह्यएज्युकेशन ऑन व्हीलसह्ण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शाळेत उपलब्ध असलेले शैक्षणिक वातावरण प्रत्यक्ष वस्तीवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवदास वाघ, मुख्याध्यापिका पुष्पा गुंजाळ, माजी सरपंच हिरामण वाघ आदी उपस्थित होते.परिणामकारक अध्यापनमोबाइल स्पीकर, हँडपपेटस्‌ तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांचे अध्यापन अधिक परिणामकारक करीत शाळेतील वातावरण प्रत्यक्ष मुलांच्या अंगणात निर्माण होत आहे. चांगल्या आरोग्याच्या सवयी, कृतीयुक्त खेळ, स्पीकरचा वापर करून कविता व गाणे घेणे, इंग्रजी संभाषणासाठी हँडपपेट्सचा वापर करणे. अशा अनेक प्रयत्नांची प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, तसेच विस्ताराधिकारी किरण वसावे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी नेलकटरचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी