जळगाव नेऊर : चैत्र मासारंभ अर्थात मराठी नववर्षाचा प्रथम दिवस. नववर्षाचे स्वागत मांगल्याचे प्रतिक गुढी उभारून सर्वत्र केले जाते. येवला तालुक्यातील अंगणगाव शिक्षक कॉलनीत नववर्षाचे स्वागत अनोखी गुढी उभारून करण्यात आली.नेहमीची गुढी कलश, नववस्त्र, हार, कडुलिंबांची डहाळी व हार-कडे यांचा वापर करून उभारली जाते. यात अधिक भर पडली ती संदेश पट्टीचे. लोकसभा निवडणुकीत भरभक्कम सरकार देशाला मिळण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे, पाणी हे जीवन आहे, त्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. प्रत्येक घरात मुलीच्या जन्माचे स्वागत झालेच पाहिजे, प्रत्येक मुलगी सन्मानाने हक्काचे शिक्षण पूर्ण करू शकली पाहीजे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली आहे. परिणामी महाभयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहीजे. मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अश्या नानाविध संदेश तयार केलेल्या पाट्या गुढयÞांना लावुन जागृती करण्यात आली.हि संकल्पना ज्ञानेश्वर पायमोडे, ज्ञानेश्वर बारगळ, लक्ष्मण जुंधरे, दिलीप धिवर, अजय जाधव, एकनाथ इंगळे, सुदाम कटारे, नवनाथ मढवई, समाधान धिवर, सिध्दार्थ धिवर, निशा धिवर, प्रणाली धिवर, मनिषा इंगळे, स्वाती चव्हाण, अलका साळवे आदींसह सर्व रहिवाश्यांनी उत्साहात अनोख्या पध्दतीने गुढीपाडवा साजरा केला.
अंगणगाव शिक्षक कॉलनीत अनोख्या पध्दतीने गुढीपाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:00 IST
जळगाव नेऊर : चैत्र मासारंभ अर्थात मराठी नववर्षाचा प्रथम दिवस. नववर्षाचे स्वागत मांगल्याचे प्रतिक गुढी उभारून सर्वत्र केले जाते. येवला तालुक्यातील अंगणगाव शिक्षक कॉलनीत नववर्षाचे स्वागत अनोखी गुढी उभारून करण्यात आली.
अंगणगाव शिक्षक कॉलनीत अनोख्या पध्दतीने गुढीपाडवा
ठळक मुद्देनानाविध संदेश तयार केलेल्या पाट्या