गुढीपाडव्याची शोभायात्रा होणार आणखी व्यापक
By Admin | Updated: April 4, 2016 23:52 IST2016-04-04T23:52:01+5:302016-04-04T23:52:30+5:30
गुढीपाडव्याची शोभायात्रा होणार आणखी व्यापक

गुढीपाडव्याची शोभायात्रा होणार आणखी व्यापक
सिन्नर : येथील सिन्नर सांस्कृतिक मंचच्या वतीने यंदाही मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्यानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पाच वर्षांपासून सिन्नरमध्ये नववर्षाचे स्वागत भव्य शोभायात्रेने केले जात आहे.
शोभायात्रेला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेनिमित्त सकाळी साडेसहा वाजता शिवाजी चौकात ४० फूट भव्य गुढी उभारून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. शिवाजी चौक, गणेशपेठ, भिकुसा कॉर्नर, शिंपी गल्ली, लालचौक, सोनारदेवी मंदिर, गंगा वेस, पंचायत समिती कॉर्नर, खडकपुरा, जुनी नगरपालिका, महालक्ष्मीरोड, लालचौक, नाशिक वेसमार्गे निघणाऱ्या शोभायात्रेची नर्मदा लॉन्स येथे सांगता होणार आहे.
यात्रामार्गावर गुढ्या उभाराव्यात, सडा-रांगोळी काढावी, पालखीवर पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करावे व यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन सिन्नर सांस्कृतिक मंचचे कृष्णाजी भगत, हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, विजय जाधव, आर. के. मुंगसे, जावेद शेख, प्रकाश नवसे, मनोहर कासार, नितेश दातीर, मनोज भंडारी, पराग शहा, चंद्रशेखर कोरडे, अनिल देशपांडे, बाळासाहेब हांडे, अमोल चव्हाण, गणेश लोखंडे, संजय झगडे, डॉ. महावीर खिंवसरा, सागर गुजराथी यांनी केले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेला सर्वांना सामावून घेणाऱ्या अवघ्या मराठी जनांच्या आनंद सोहळ्यात सर्वांनी सहकुटूंब पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. (वार्ताहर)