शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
3
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
4
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
5
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
6
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
7
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
8
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
9
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
10
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
11
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
12
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
13
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
14
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
15
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
16
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
17
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
18
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
19
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
20
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभावासाठी पालकमंत्री, खासदारांना शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 15:44 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुस:या टप्प्यात रविवारी (दि.27) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपूरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचा सत्याग्रह विशेष अधिवेशनाच्या मागणीसीठी पालकमंत्री, खासदारांना निवेदन

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुस:या टप्प्यात रविवारी (दि.27) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपूरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली. या अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा अधिकार 2017 आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके संसदेत सादर केली जाणार असून या विधेयकांना पाठींबा देण्याचे आवाहनही नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने यावेळी केले आहे.नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या माध्यामातून विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. परंतु गिरीश महाजन कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या स्विय सहायकांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले .त्यानंतर दुपारी आंदोलन समितीने खासदार हरीचंद्र चव्हाण यांच्या नाशिक शहरातील निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन करीत त्यांना निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकार्पयत पोहोचवून त्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. परंतु, गोडसे कार्यालयात नसल्याने आंदोलकांना सुरारे तासभर गोडसे यांची प्रतिक्षा करावी लागली. गोडसे कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शेतक:यांना संपूर्ण कजर्मुक्ती व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्याची मागणी केली. त्यावर गोडसे यांनी शेतक:यांच्या मागण्या रास्त असून संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी कें द्र स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी सत्याग्राचा समारोप केला. या सत्याग्रह आंदोलनात महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती सेना,भारतीय साम्राज्य संघटना, बळीराजा प्रतिष्ठान, मराठा क्र ांती मोर्चाच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेत शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकFarmerशेतकरीMember of parliamentखासदार