शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

समृद्धी महामार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 7:02 PM

नांदूरवैद्य : राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन

नांदूरवैद्य : राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी समृद्धी महामार्गाच्या जीव्हीपीआर आणि ॲफकॉन या कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची तातडीची बैठक घेत समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करत येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास समृद्धी महामार्गाचे काम बंद करण्यात येईल असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी येथील पिंप्री शासकीय विश्रागृहावर पार पडलेल्या बैठकीत नुकताच दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.                             इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सुरु असलेल्या कामांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच कामामुळे होणारे नुकसान याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काम बंद करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दै. लोकमतमध्ये दि. ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होताच जिल्ह्याचे पालकमंञी छगन भुजबळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तसेच सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सदर समस्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाचे अधिकारी यांची बैठक घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच प्रलंबित मागण्यांचे लवकरात लवकर निरसन करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.याप्रसंगी आमदार माणिक कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, तहसिलदार परमेश्वर कासुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. बी. गायकवाड, अधीक्षक अभियंता आर. पी. निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, अभियंता एन. के. बोरसे, पी. व्ही. सोयगावकर, एन. एच. ए. आयचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरुण गायकर, आगरी समाज सचिव भोलेनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर कडु, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, सरपंच ज्ञानेश्वर तोकडे, पांडुरंग शिंदे, सुरेश कडू, निवृत्ती तुपे, मदन बिनर, सिद्धार्थ भांबरे, आदींसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गChagan Bhujbalछगन भुजबळ