समृद्धी महामार्गाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:03 IST2021-02-09T19:02:38+5:302021-02-09T19:03:26+5:30
नांदूरवैद्य : राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पाहणी करून चर्चा करतांना छगन भुजबळ, समवेत हिरामण खोसकर, माणिक कोकाटे, गोरख बोडके, ॲड. संदिप गुळवे व इतर शेतकरी.
नांदूरवैद्य : राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत इगतपुरी त्र्यंबकेश्वर संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी समृद्धी महामार्गाच्या जीव्हीपीआर आणि ॲफकॉन या कंपनीचे अधिकारी व शेतकरी यांची तातडीची बैठक घेत समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करत येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास समृद्धी महामार्गाचे काम बंद करण्यात येईल असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी येथील पिंप्री शासकीय विश्रागृहावर पार पडलेल्या बैठकीत नुकताच दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न पुरवठा व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर व सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्यासह समृद्धीबाधित शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सुरु असलेल्या कामांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच कामामुळे होणारे नुकसान याबाबत आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काम बंद करण्याचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दै. लोकमतमध्ये दि. ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होताच जिल्ह्याचे पालकमंञी छगन भुजबळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तसेच सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सदर समस्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत समृद्धी महामार्गाचे अधिकारी यांची बैठक घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच प्रलंबित मागण्यांचे लवकरात लवकर निरसन करण्याचे आदेश उपस्थित अधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
याप्रसंगी आमदार माणिक कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, तहसिलदार परमेश्वर कासुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. बी. गायकवाड, अधीक्षक अभियंता आर. पी. निघोट, कार्यकारी अभियंता सतीश श्रावगे, कार्यकारी अभियंता डी. के. देसाई, अभियंता एन. के. बोरसे, पी. व्ही. सोयगावकर, एन. एच. ए. आयचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरुण गायकर, आगरी समाज सचिव भोलेनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर कडु, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे, सरपंच ज्ञानेश्वर तोकडे, पांडुरंग शिंदे, सुरेश कडू, निवृत्ती तुपे, मदन बिनर, सिद्धार्थ भांबरे, आदींसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.