नांदगावच्या वीज भारनियमाबद्दल पालकमंत्र्यांनी मागितला अहवाल

By Admin | Updated: May 29, 2014 01:05 IST2014-05-27T22:41:14+5:302014-05-29T01:05:31+5:30

नांदगाव - शहरातील जनतेवर लादण्यात आलेले भारनियमन कोणत्या निकषावर लादण्यात आले याची विचारणा.

Guardian minister asked for Nandgaon electricity loads | नांदगावच्या वीज भारनियमाबद्दल पालकमंत्र्यांनी मागितला अहवाल

नांदगावच्या वीज भारनियमाबद्दल पालकमंत्र्यांनी मागितला अहवाल

नांदगाव - शहरातील जनतेवर लादण्यात आलेले भारनियमन कोणत्या निकषावर लादण्यात आले याची विचारणा करीत भारनियमानाबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल दोन दिवसात सादर करावा असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दिलेत नांदगाव चे माजी आमदार संजय पवार, राजेश शिंदे यांनी नाशिकला जिल्हा नियोजन मंडळा च्या बैठकीवेळी पालकमंत्र्यांचे नांदगाव वर लादण्यात आलेल्या भारनियमना बाबत लक्ष वेधण्यात आले आमदार पंकज भुजबळ यांनीही पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दशानास ही बाब आणून देताना नांदगाव शहरातील भाग १ मध्ये ९४ टक्के तर भाग २ मध्ये ९१ टक्के वसुली चे प्रमाण असताना केवळ वीज गळतीचे कारण देऊन हे भारनियमन लादले असा युक्तिवाद माजी आमदार पवार व शिंदे यांनी करताना वीज गळती रोखण्याचे काम कोणाचे व त्याला घरगुती ग्राहक जबाबदार कसे याचा खुलासा वीज वितरण अधिकारी करीत नसल्याने नांदगाव शहरावर हे भारनियमन चुकीच्या पद्धतीने लादले गेले शिवाय शासकीय व निमशासकीय कार्यालयांची थकबाकी दहा टक्क्या एवढी असल्याचे पालकमंत्र्याच्या लक्षात आणुन दिले. त्यानंतर वीज वितरण अधिकार्‍यांनी दोन दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश वीजवितरण च्या अधिकार्‍यांना दिले. आता तरी भारनियमन थांबेल अशी अपेक्षा जनतेत व्यक्त होत आहे.

Web Title: Guardian minister asked for Nandgaon electricity loads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.